
मी माझ्या बालपणापासून भूतांबद्दल अनेक कथा एकल्या आहेत.काही घटना ह्या सत्य म्हणून ही अनेकांकडून एकण्यात आल्या,म्हणून मी त्यावर आधारित काही काल्पनिक घडामोडींचा आधार घेत कथा आणखी रोमांचकारी करण्याचा प्रयत्न केला.आणि आपल्या ह्या पुस्तकात त्या घटनांचा कथेरुपात समावेश केला.हे पुस्तक अश्याच सत्य तसेच काल्पनिक घटनांनी भरपूर आपणास वाचण्यास मिळेल.आणि भुतांवर आधारित कथा आवडणाऱ्याना हा रोमांच शेवटपर्यंत कायम ठेवण्यास हे माझे पुस्तक नक्कीच मदत करेल.